योजनेची उद्दिष्टे:
• 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांचा पोषण व आरोग्य विषयक दर्जा सुधारणे.
• मुलांच्या योग्य मानसिक, शारीरिक, सामाजिक विकासाचा पाया घालणे.
• बालमृत्युचे,बालरोगाचे, कुपोषणाचे आणि मध्येच शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे.
• बालविकासास चालना मिळावी म्हणून विविध विभागांमध्ये धोरण व
• अंमलबजावणी याबाबत परिणामकारक समन्वय साधणे.
• योग्य अशा पोषण व आहार विषयक शिक्षणाद्वारे बालकांचे सर्वसामान्य आरोग्य
• व त्यांच्या पोषण विषयी गरजांकडे लक्ष पुरविण्याविषयीची मातांची क्षमता वाढविणे.
केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सहा वर्षाच्या आतील मुले, गरोदर स्त्रीया तसेच स्तनदा माता व 15 ते 45 वर्षे वयोगटातील प्रौढ स्त्रिया, किशोरी मुलींना विविध सुविधा व सेवा पुरविण्यात येतात.
पूरक आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, वैद्यकीय संदर्भ सेवा, पोषण व आरोग्य शिक्षण आणि औपचारिक शिक्षण हे योजनेचे घटक आहेत.
• महाराष्ट्र राज्यात 553 प्रकल्प मंजूर असून त्यात 364 ग्रामीण, 104 शहरी व 85 आदिवासी
• एकात्मिक बाल विकास प्रकल्पांत जवळपास 125-200 अंगणवाडी केंद्रांचा समावेश असतो.
• साधारणपणे ग्रामीण व नागरी क्षेत्रात किमान 400 ते 800 लोकसंख्येसाठी 1 अंगणवाडी केंद्र तसेच 150-400 लोकसंख्येसाठी 1 मिनी अंगणवाडी केंद्र तसेच आदिवासी क्षेत्रात 300 ते 800 लोकसंख्येसाठी एक अंगणवाडी केंद्र व 150-300 लोकसंख्येसाठी 1 मिनी अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. प्रत्येक अंगणवाडीमध्ये एक अंगणवाडी सेविका आणि मदतनिस असते.साधारणत: 25 अंगणवाडयांसाठी एक पर्यवेक्षिका असते. अंगणवाडयांच्या कामकाजावर पर्यवेक्षण करणे हे त्यांचे काम असते.
आय सी डी एस हा भारत सरकारने पुढाकार घेऊन सुरु केलेल्या उपक्रमांपैकी एक असून राज्यातील महिला व बाल विकास विभागामार्फत कार्यान्वित करण्यात आले.
• आय सी डी एस लहान बालकांना पोषण आहार, आरोग्य निगा आणि शालापूर्व शिक्षण सेवा संकलित स्वरुपात पुरव इच्छिते.
• लहान बालकांच्या आरोग्य आणि पोषणाच्या समस्या त्याच्या किंवा तिच्या मातेचा
विचार न करता सोडविता येणे शक्य नाही आणि म्हणूनच या उपक्रमाची व्याप्ती किशोरावस्थेतील मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्यापर्यंत विस्तारण्यात आली आहे.
• आय सी डी एस उपक्रम मुलांना आणि मातांना त्यांच्या गावात किंवा वॉर्डात सर्व पायाभूत, आवश्यक सेवा एकत्रितपणे पुरवू इच्छिते. ही योजना शहरी
झोपड्यांमधून आणि ग्रामीण तसेच आदिवासी विभागातून टप्प्याटप्प्याने विस्तारली आहे.
• राज्यात आय सी डी एस उपक्रमाचे एकूण ५५३ प्रकल्प कार्यरत असून ३६४ ग्रामीण,
८५ आदिवासी विभागात आण १०४ शहरी झोपडपट्ट्यांमध्ये आहेत.
• या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या काही प्रमुख सेवा :
o पूरक पोषण आहार
o लसीकरण
o आरोग्य तपासणी
o संदर्भ आरोग्य सेवा
o अनौपचारीक शालापूर्व शिक्षण
o पोषण आणि आरोग्य शिक्षण
Smart_Anganwadi_0.pdf (3.15 MB)
महिला आणि मुले
अंगणवाडी सेविकेमार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आरोग्य, पोषण आहार व पूर्वप्राथमिक शिक्षण या बाबी पुरविण्यात येतात. याकरीता सदर अंगणवाडी केंद्राचे रुपांतर आदर्श अंगणवाडी केंद्रामध्ये रुपांतरीत करणे ही काळाची गरज आहे. अंगणवाडी केंद्राचे शिक्षण आनंददायी व्हावे, तेथील सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी 'आदर्श अंगणवाडी योजना' आखली आहे.सदर केंद्रांमध्ये मुलांना आनदंदायी वातावरणात पूर्व शालेय शिक्षण, आरोग्य, पोषण आहार देण्यात येतात. तसेच किशोरवयीन मुली व महिलांना कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षित करण्यात येते.
अंगणवाडयांचा दर्जा सुधारून व त्यांच्या पायाभूत योयी-सुविधांमध्ये वाढ करुन त्यांना आदर्श अंगणवाडीमध्ये रुपांतरीत करणे
अंगणवाडी केंद्राचे शिक्षण आनंददायी करणे
अंगणवाडयांचा दर्जा सुधारुन व त्यांच्या पायाभूत योयी-सुविधांमध्ये वाढ करुन त्यांना आदर्श अंगणवाडीमध्ये रुपांतरीत करणेसाठी अंगणवाडीत सौर उर्जा संच, अंगणवाडी इमारतीसाठी शैक्षणिक साहित्य,ई-लर्निंग, पायाभूत सुविधा- LED TV with USB port and Pendrive बालकांसाठी खुर्च्या व टेबल, बालकांसाठी स्वच्छ भारत संच, वॉटर प्युरिुफायर (वीज विरहीत), इमारतची बाहय रंगरंगोटी, सुशोभिकरण, शौचालय दुरस्ती, परिसर स्वच्छता, किरकोळ दुरस्ती इ., बाबींचा समावेश आहे.
सन 2018-19 पासून पुढील 4 वर्षाकरिता दरवर्षी 5000 अंगणवाडी केंद्राचे आदर्श अंगणवाडीत रुपांतर करण्यात येणार आहेत.
स्वमालकीच्या इमारतीमधील अंगणवाडयांचे आदर्श अंगणवाडीत रुपांतर करण्यात येत आहे.
राज्यातील ६८ हजार स्वत:च्या इमारती असलेल्या अंगणवाड्यांची प्राधान्याने निवड करण्यात आली आहे. सद्यस्थितीत या योजनेअंतर्गत राज्यातील 2560 अंगणवाडयांचे आदर्श अंगणवाडीत रुपांतर करण्यात आले आहे.